राजकुमार रावच्या आगामी 'श्रीकांत: आ रहा है सबकी आंखे खुने' या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या चरित्रावर आधारित हा बायोपिक आहे. उद्योगपती श्रीकांत बोल्ला हे अनेक लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार राव यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
श्रीकांत' हा चित्रपट 10 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओतील चित्रपटाची पहिली झलक लोकांना खूप आवडली आहे. या व्हिडिओतील श्रीकांतच्या भूमिकेतील राजकुमार रावचा लूक खूप पसंत केला जात आहे. राजकुमार धावत येतो आणि व्हिडीओच्या शेवटी चित्रपटाचे शीर्षक आणि रिलीज डेट दिसते. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव 'श्री' असे होते. पण नंतर त्याचे नाव बदलून 'श्रीकांत' करण्यात आले. इंस्टाग्रामवर चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करताना अभिनेता राजकुमारने लिहिले की, "एक प्रेरणादायी जीवन कथा जी तुमचे डोळे कायमचे उघडेल." श्रीकांत तुम्हा सर्वांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी येत आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटाची अभिनेत्री आलिया एफ हिने देखील या चित्रपटाचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया साइटवर शेअर केला आहे.
श्रीकांत बोल्ला हे भारतीय उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्यवस्थापन शास्त्रातील ते पहिले आंतरराष्ट्रीय दृष्टिहीन विद्यार्थी आहे. त्यांचा जन्म 1991 मध्ये आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम शहरातील सीतारामपुरम येथे दृष्टिहीन बालक म्हणून झाला. त्यांचे कुटुंब प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते. मॅट्रिकनंतर त्यांनी बारावीत विज्ञानाचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांना तशी परवानगी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी केस दाखल केली आणि सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर विज्ञानाचा अभ्यास करण्याची परवानगी देण्यात आली. 12वी बोर्डाच्या परीक्षेत 98% गुण मिळवून ते पहिले आले .श्रीकांत हे हैदराबाद-आधारित बोलंट इंडस्ट्रीजचे सीईओ आहेत, जी 50 कोटी रुपयांची पर्यावरणपूरक, डिस्पोजेबल ग्राहक पॅकेजिंग सोल्यूशन्स तयार करण्यासाठी अकुशल अपंग कामगारांना कामावर ठेवते.