श्रीदेवीने का नाकाराले बाहुबलीला?

खूप कमी लोकांना हे माहीत असेल की दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जेव्हा बाहुबली बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा यातील अती महत्त्वाची भूमिका शिवागामी साठी त्यांच्या डोक्या सर्वात आधी श्रीदेवीचे नाव आले होते. शिवागामी या चित्रपटातील सर्वात सशक्त भूमिकेतून एक आहे.
त्यांनी जेव्हा श्रीदेवीला रोल ऑफर केला तेव्हा श्रीदेवीला ही भूमिका आवडली होती पण तिने सहा कोटी फीस मागितली. चित्रपटाचे बजेट आधीपासून जास्त असल्यामुळे राजमौलीला या भूमिकेवर एवढा पैसा खर्च करायचा नव्हता. श्रीदेवीने त्यांचा फीस कमी करण्याचा प्रस्ताव नकाराला. नंतर राजामौली यांनी राम्या कृष्णनला हा रोल ऑफर केला आणि अडीच कोटीत त्याचे काम झाले वरून तिने आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 
 
आता बाहुबली ने हिट आणि कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यानंतर श्रीदेवीला नक्कीच दु:ख होत असेल.

वेबदुनिया वर वाचा