सोनाली बेंद्रेची मुलासाठी इमोशनल पोस्ट

लंडन येथे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्यात तिचा मुलगाही दिसत आहे. तिनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या मुलाला रणवीरला पत्र लिहिलंय. 
 
सोनालीने लिहिले, 12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवसापूर्वी माझ्या मुलाचा जन्म झाला त्याच क्षणी आमचे हृदय जिंकले. त्यानंतर माझ्या आणि गोल्डीच्या आयुष्याच्या एकच उददेश्य होता रणवीरचा आनंद. कॅन्सरबद्दल कळल्यावर आमच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे रणवीरला याबद्दल कसं सांगायचं? आम्हाला त्याला सर्व त्रासापासून वाचवायचे होते पण सांगणे देखील गरजेचं होतं. आम्ही त्याला सर्व खरं सांगितलं आणि त्याने समजूतदारपणे ऐकलं आणि तो माझी शक्ती झाला. आता अनेकदा तो माझ्यासाठी पालकासारखा व्यवहार करतो आणि माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगतो.
 
मला असं वाटतं की प्रत्येक परिस्थितीत आम्हाला आपल्या मुलांना सत्य सांगावं. त्यांच्यासोबत वेळ घालवावा. योग्य वेळेची वाट पाहून त्यांना दूर ठेवू नये. सध्या रणवीरच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे तो सोनालीसोबत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती