सोनाक्षीला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून टीका

गुरूवार, 20 जुलै 2017 (11:43 IST)
यंदाचा आयफा पुरस्कार सोहळ्यात सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून सोशलमिडीयात टीकेला सामोरे जावे लागले.

सोनाक्षीने बिकिनी ब्लाऊजसोबत स्कर्ट घातला होता आणि त्यावर ओढणी घेतली होती. परंतु वर्स्ट ड्रेसच्या श्रेणीत सोनाक्षी सिन्हाचे नाव वरच्या क्रमाकांवर घेण्यात येत आहे.

 
आयफामधील सोनाक्षी सिन्हाच्या लूकवर बरीच उलट सुलट चर्चा पाहायला मिळाली. या लूकवरुन नेटीझन्सनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केले. काहींनी तिची तुलना पोपटाशी केली तर काहींनी मॅचिंग ओढणी मिळाली नाही का?, असा प्रश्नही विचारला. दरम्यान, तिचा हा लूक आगामी चित्रपटाच्या हेतूने करण्यात आला होता. मात्र याच लूकमुळे सोनाक्षीला टीकेचा सामना करावा लागला. 

वेबदुनिया वर वाचा