किंग आणि सुलतान सोबत काम करणार

शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (14:26 IST)
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान तर  सुलतान  सलमान खान पुन्हा एकदा एकत्र काम करणार  आहेत. मात्र हे चित्रपटात नसून हे दोघं खूप वर्षांनी   शो होस्ट करणार असल्याची माहिती मिळते आहे. तर यावर्षी सलमान आणि शाहरुख या वर्षी स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्टिंग करताना दिसणार आहेत.  सलमान आणि शाहरुखने एकत्र अवॉर्ड शो होस्ट करणे ही बाब बॉलिवूडसाठी खूप मोठी आहे. यामुळे होस्टिंगच्या स्क्रीप्टवरदेखील खूप काम सुरू आहे.त्यामुळे भविष्यात हे दोघे चित्रपट एकत्र करतील असे चिन्हे दिसत आहेत. सलमान आणि शाहरुख अनेक वर्षे एकमेकांसोबत काम करत नव्हते आमत्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत. या दोघांना चित्रपट सोबत घेऊन करेल असा फक्त करण जोहर आहे.

वेबदुनिया वर वाचा