नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला, “मला अगदी खरोखर वाटत आहे की या ओटीटी माध्यमावर सेन्सॉरशिप असायला हवी. या प्लॅटफॉर्मवरिल सर्व…अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ थांबली पाहिजे. 15 किंवा 16 वर्षांची लहान मुलेही ते पाहत आहेत. आपल्या कुटुंबातील तरुण मुलीने ते पाहिले तर तुम्हाला आवडेल का? मला वाटते की OTT वरील आशय तपासला गेला पाहिजे. कंटेंट जितका स्वच्छ असेल तितकि त्याला दर्शक असतील.”
पुढे बोलताना सलमान म्हणाला, पडद्यावर या गोष्टी करणार्या कलाकारांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “तुम्ही हे सर्व ओटीटीवर केले आहे. खुलेआम प्रेम करणे, चुंबन घेणे आणि दृश्यांमध्ये स्वताला एक्सपोज करणे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या चौकीदारानेही तुमचे काम पाहिलेले असते. मला या सर्व गोष्टी असुरक्षित वाटतात. त्यामुळे मी हे करत नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor