‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’चा टीझर 14 एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाला होता. खुद्द सचिन तेंडुलकरने हा सस्पेन्स संपवला असून प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिलं आहे की, “सर्व जण मला जो प्रश्न विचारत होते, त्याचं उत्तर हे आहे. कॅलेंडरवर खूण करुन ही तारीख लक्षात ठेवा.” या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीने हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे.