सर्वात घातक गोष्ट रोमान्स: ऋतिक

ऋतिकने रोमान्सविषयीची त्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. आगामी काबिल चित्रपटासाठी सज्ज झालेला ऋतिक म्हणाला की, प्रेम नाही तर रोमान्स आंधळा असतो. सर्वात जास्त घातक गोष्ट रोमान्स ही आहे. कारण हे सर्व काही भ्रामक आहे. रोमान्सनंतर जर का कोणती गोष्ट अस्तित्वात राहते तर ती म्हणजे प्रेम आणि प्रेम आंधळे नसते, असे ऋतिक म्हणाला.
 
ऋतिक आपल्याबद्दल इतर लोक काय बोलतात, काय विचार करतात या नकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष देत नाही. याउलट ऋतिक बोल लावणार्‍या या अशा लोकांच्या चुका माफ करण्यातच सकारात्मकता मानतो. ऋतिकने यावेळी त्याच्या खासगी आयुष्यातील नात्यांमध्ये आलेल्या चढ- उतारांविषयीही मोकळेपणाने सांगितले.
 
तुमच्यातील चांगलेपणा किंवा तुमच्यातील वाईटपणा एक ना एक दिवस तुमच्या कामातून, वागण्याबोलण्यातून समोर येणारच, असेही ऋतिक यावेळी म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा