वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखला अश्रू अनावर

रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (15:20 IST)
लातूर मध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. देशमुख कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होता. या वेळी रितेश देशमुखने भाषण केलं. आणि आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषण वाचतांना अभिनेता रितेश देशमुख याचे अश्रू अनावर झाले आणि त्याला रडू कोसळले. त्यावेळी त्याच्या मोठा भाऊ अमित देशमुख याने त्यांना सावरलं. 

या वेळी आपल्या भाषणात रितेश म्हणजे. भावांचं प्रेम काय असतं हे मी माझ्या वडिलांचे आणि माझ्या काकांचे म्हणजे विलासराव देशमुख आणि दिलीपराव  देशमुख यांच्यात पहिले आहे. आमचे वडील विलास राव साहेब यांना जाऊन 12 वर्षे झाली. त्यांची उणीव आम्हाला नेहमीच भासते. मात्र आमचे काका दिलीपराव यांनी आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला नेहमीच साथ दिले. माझे माझ्या काकांवर नितांत प्रेम आहे. मी आजवर हे काकांना कधीच सांगितले नाही. पण आज सर्वांसमोर त्यांना सांगत आहे. काका मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं काय असत हे आज आपण बघणार. 

या नंतर रितेश भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. या वेळी त्यांची आई वैशाली देशमुख या देखील भावुक झाल्या. या वेळी रितेश यांचे मोठे भाऊ अमित देशमुख यांनी रितेशला जाऊन धीर दिला. 
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती