ऋषी कपूनने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा अनुभव शेअर करत लिहिले की न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं स्नीकर स्टोअर, जेथे मी 12,000 हून अधिक स्टाइल आणि मॉडलचे स्नीकर्स बघितले. मी हैराण आहे की या स्नीकर्सची किंमत USD 40,000 (Rs 27,56,900), USD 27,000 (Rs 18,60,907), USD 25,000 (Rs 17,23,062) आणि USD 20,000 (Rs 13,78,450) पर्यंत आहे. सामान्यात किंमत USD 5,000 (Rs 3,44,732) किंवा याहून अधिकच आहे.
आपल्या दुसर्या ट्विटमध्ये ऋषी कपूर लिहितात, या स्नीकर्सची किंमत लक्ष देऊन बघा. मला हे ती गोष्ट जाणवतात की जोडे सोन्याचे असो वा चांदीचे, शेवटी घालायचे तर पायातच...
अलीकडेच ऋषीच्या येणार्या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले गेले आहे ज्यामुळे ऋषीच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता बघायला मिळाली आहे. ऋषी चित्रपट 'झूठा कहीं का' याने बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. हा सिनेमा 19 जुलै रोजी रिलीज होणार आहे. तसेच ऋषी कपूर या वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा भारतात येणार अशी चर्चा देखील आहे. ते स्वत: देखील भारतात येण्यासाठी आतुर झाले आहेत.