बोल्ड सीन्स गरजेपुरेतच

कायम वेगळ्या पद्धतीचे आणि उत्तम सिनेमे निवडणारी अभिनेत्री म्हणून रिचा चड्ढा ओळखली जाते. मसान, रामलीला या सिनेमांमधल्या तिच्या भूमिकाही खूप गाजल्या होत्या. आता चर्चा आहे ती तिच्या आगामी कॅब्रे सिनेमाची.
 
सिनेमात उगाच दाखवल्या जाणार्‍या हॉट सीन्सबद्दल मात्र ‍ती काहीशी नाराज असते. जिथे गरज असेल तिथे अशी दृश्य दाखवायला हरकत नाही. पण फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी जर ते केलं जात असेल तर ते मात्र चुकीचं आहे.
 
अशा दृश्यांनी सिनेमाला प्रसिद्धी मिळत नसते असे स्पष्ट मत रिचा व्यक्त करते. कॅब्रे मध्ये आम्ही ही काळजी घेतली आहे असेही ती सांगते.

वेबदुनिया वर वाचा