ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू कालवश

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झाल आहे त्यांचे वय 59 वर्षांच्या होते. बॉलिवूडची अर्थात हिंदी चित्रपटात त्यांनी ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत झाल्या होत्या.
मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. पण आज सकाळी पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
 
रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या गेल्या मात्र त्यांनी जिवंत अभिनयाने आपली वेगळी ओळख तयार केली होती. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.
 
रीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचं ‘लेकुरे उदंड जाहले’ हे नाटक प्रचंड गाजलं होतं. तर रीमा यांना श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं या दोन सिरीयल ने खूप मोठे नाव मिळवून दिले होते मराठी तर उत्तम सोबतच त्यांचे हिंदी ही उत्तम असल्याने त्यांना अभिनय करत असतांना कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली होती. 
 
अनेक मराठी आणि हिंदी अभिनेत्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा