रामदेवबाबा 'ये है इंडिया’ तून बॉलीवूडमध्ये

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:42 IST)

योगगुरू रामदेवबाबा “ये है इंडिया’ या देशभक्तीवर आधारित चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. या चित्रपटातील “सैंया सैंया’ या गाण्यात ते झळकणार आहेत. लोमहर्ष या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. बाबा रामदेव चित्रपटाचे समर्थन करत म्हणाले की, काही लोकांकडून जाणीवपूर्वक भारताविषयी गैरसमजूती निर्माण केल्या जात आहे. मात्र, भारताकडे जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता. हा बदल “ये है इंडिया’तून दिसून येईल. मला आशा आहे की, लोकांकडूनही त्याला समर्थन मिळेल. या चित्रपटाची कथा देशभक्तीशी जोडलेली असल्याने या चित्रपटात काम करण्यास रामदेवबाबांनी संमती दिली.

या चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथ राज्यात करण्यात आले आहे. अभिनेत्री डायना उपल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रामदेवबाबांनी यापूर्वी एका डान्स शोमध्ये पाहुणे कलाकार म्हणून तसेच अन्य एका शोमध्ये सोनाक्षी सिन्हासह जजची भूमिका पार पाडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती