सुपरस्टार अभिनेता रजनीकांत पायाला मार लागल्याने जखमी झाले आहेत. '2.0' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरण्याच्यावेळी ही घटना घडली. येथील केलम्पकम खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र किरकोळ मार असल्याने काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले.