सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटच्या बातम्या चर्चेत आहेत. परिणीती आणि राघव चढ्ढा उद्या म्हणजेच13 मे रोजी दिल्लीत लग्न करणार आहेत. 100 हून अधिक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील तिच्या चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी भारतात येत आहे. अलीकडेच प्रियंका तिच्या सिटाडेल या मालिकेच्या प्रमोशनसाठी भारतात आली होती. अशा परिस्थितीत ती परिणीतीच्या एंगेजमेंटला हजर राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता प्रियांका एंगेजमेंटला हजर राहणार असल्याची बातमी आहे.