प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर आपल्या नावातून वगळले जोनास, पती निकसोबत घटस्फोटाची चर्चा

मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (11:23 IST)
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर तिच्या नावामधून जोनास वगळले आहे. प्रियांकाने हे केल्यामुळे प्रियांका आणि निक जोनासच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर पकडला आहे.  प्रियांकाचे चाहतेही यामुळे नाराज झाले आहेत.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास या जोडप्याची गणना पॉवर कपल्स मध्ये केली जाते.  लग्नानंतर प्रियांकाने तिच्या नावासमोर जोनास लिहिण्यास सुरुवात केली, मात्र अचानक प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या नावासमोर जोनास हा शब्द काढला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे चाहते चांगलेच नाराज होत आहेत, तर दुसरीकडे निक-प्रियांका यांच्या घटस्फोटाच्या अटकळांनाही वेग आला आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती