"मी तुम्हाला पाहते आहे. बू वॉच बी बॅड, बेवॉच मूव्ही, सर्वांना हॅपी हॅलोवीन", असं ट्विट करून प्रियंकानं चाहत्यांना आगामी हॉलिवूडपटाची झलक दाखवली आहे. या पोस्टरमध्ये 34 वर्षांच्या प्रियंकानं ब्लॅक वन शोल्डर आणि हाय स्लिट गाऊन परिधान केलं आहे.
बेवॉच या हॉलिवूडपटात प्रियंकासोबत झॅक एफ्रॉन, ड्वेन जॉन्सन, एलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस दिसणार आहेत. या हॉलिवूडपटाचं मुख्य पोस्टर जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये या हॉलिवूडपटातील सर्व पात्रांना दाखवण्यात आलं होतं.