'स्कॅम 1992' आणि 'द ग्रेट इंडियन मर्डर' यांसारख्या वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळविणारा अभिनेता प्रतीक गांधी याने रविवारी ट्विट करून मुंबई पोलिसांवर आपला अपमान केल्याचा आरोप केला. त्यांनी काल संध्याकाळी एक ट्विट केले, ज्यामध्ये व्हीआयपी मुव्हमेंटमुळे पोलिसांनी आपल्याशी अन्यायकारक वागणूक दिल्याचा दावा केला.
प्रतीक गांधी यांनी ट्विट केले की, "व्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईचा वेस्टर्न एक्स्प्रेस वे हायवे जाम झाला होता. त्यामुळे मी पायीच माझ्या शूटिंग लोकेशनकडे जायला लागलो. त्यानंतर पोलिसांनी मला खांद्याला धरून गोदामात कुठलेही संभाषण न करता अडकवले. अपमानित झाल्यासारखे वाटते.
"शनिवारीच मुंबई वाहतूक पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, व्हीआयपी मुव्हमेंटमुळे 24 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 ते 9 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते धारावी आणि माटुंगा या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक संथ राहू शकते. मुंबईकरांना विनंती आहे की, या मार्गांऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा."