भारतात पॉर्न पाहणाऱ्याच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ

बुधवार, 6 मे 2020 (22:15 IST)
लॉकडाउन काळात पॉर्न बघणाऱ्या भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. एका पाहणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांसंदर्भात लॉकडाउनच्या काळात भारतात एक पाहणी करण्यात आली. त्या पाहणीत भारतात पॉर्न पाहणारांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. ८९ टक्के भारतीय मोबाईलवरून थेट साईटवर जाऊन पॉर्न बघतात. तर ३० ते ४० टक्के भारतीय पॉर्न ग्राहक हे व्हिडीओ डाउनलोड करून पाहतात, असं या पाहणीतून समोर आलं आहे. 
 
 पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढण्यामागे महत्त्वाचं एक कारण म्हणजे स्वस्त झालेला डेटा. भारतात इंटरनेट डेटा खूप स्वस्तात मिळतो, त्याचबरोबर तारुण्यात येणारी ही पिढी फ्री पॉर्नच्या सापळ्यात अडकली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती