'द काश्मीर फाइल्स'वरून सुरू असलेल्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पीएम मोदी यांनी मंगळवारी सांगितले. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत काश्मीर फाइल्स चित्रपटावरही चर्चा झाली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले. काश्मीर फाइल्स या चित्रपटाची सध्या चित्रपटगृहांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या नरसंहार आणि पलायनाची शोकांतिका यात दाखवण्यात आली आहे. आता पंतप्रधानांनी या चित्रपटाची चर्चा केली आहे. काश्मीरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.