२०१० मध्ये अभिनेत्रीचा पहिला चित्रपट दबंग आला. त्याआधी, सोनाक्षीचे वजन इतके होते की कोणताही कास्टिंग दिग्दर्शक, दिग्दर्शक किंवा अभिनेता आपल्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून तिला घेण्याचा विचार ही करत नव्हते.
सलमानने तिला बोलवून म्हटले की, मी तुला माझ्या चित्रपटात घेईन, परंतु यासाठी आधी तुला वजन कमी करावे लागेल.
यानंतर सोनाक्षीने सलमानची ट्रीट पुढे ढकलली. पण हळू हळू वेळ निघून गेला.
दोन्ही अभिनेते आपापल्या कामात व्यस्त झाले. आता सोनाक्षी सांगते की आजही तिला पश्चात्ताप आहे की आतापर्यंत तिने सलमानला ट्रीट दिले नाही.