जेम्स बॉण्ड’ हा सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अॅक्शन आणि अनोख्या स्टाईलमुळे लोकप्रिय झालेल्या ‘जेम्स बॉण्ड’चा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस (james bond trailer)येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टु डाय’ असं आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.
‘नो टाइम टू डाय’चा पहिला ट्रेलर मराठी भाषेसह १० इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला होता. परंतु दुसरा ट्रेलर मात्र केवळ इंग्रजीमध्येच प्रदर्शित झाला (james bond trailer) आहे. ‘नो टाईम टु डाय’मध्ये अभिनेता डॅनियल क्रेग बॉण्डची भूमिका साकारणार आहे. बॉण्ड सीरिजमधील हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. जेम्स बॉण्डच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट असेल असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.