'हरामखोर’ चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दिकी याने मानधनात केवळ एक रुपया घेतल्याचे समजते. याविषयी चित्रपटाच्या सह निर्माती असलेल्या गुनीत मोंगा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, नवाजुद्दीन आणि चित्रपटातील बाकी सदस्यांनी कमीत कमी तसेच काहींनी तर मानधन न घेताच काम केले आहे.