बॉलीवूडमध्ये धक धक गर्लच्या नावाने प्रसिद्ध माधुरी दीक्षित 50 वर्षांची झाली आहे. आज माधुरी आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. 15 मे, 1967 ला तिचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. माधुरी दीक्षित हिंदी सिनेमातील एक वेगळी ओळख आहे. आज देखील प्रत्येक व्यक्ती तिची अॅक्टिंग, डांस आणि सुंदरतेचा दिवाना आहे.
माधुरीचे बालपण
वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षित यांची लाडकी माधुरीला लहानपणा पासूनच डॉक्टर बनायची इच्छा होती, पण ती अभिनेत्री बनली. माधुरी दीक्षिताने भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे म्हणून आजच्या नायिका तिला आपले आदर्श मानतात.
चित्रपट
तेज़ाब, अबोध, त्रिदेव, राम-लखन, प्रेम ग्रन्थ, हम आपके हैं कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रस्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, देवदास, अंजाम, कानून अपना अपना, बेटा, दिल, राजा, लज्जा, खलनायक, किशन-कन्हैया, घरवाली-बाहरवाली, कोयला, मृत्युदंड, दीवाना मुझसा नहीं, सैलाब, वर्दी, देवदास, आज नचले, गुलाब गैंग, डेढ़ इश्किया