प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. २८ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट गदर २ आणि ओएमजी 2च्या शर्यतीत चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दरम्यान कोणताही चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा त्याचे यश हे त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जेवढी कमाई केली त्यावरुन मोजले जाते. करणच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीनं प्रचंड यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवर करणनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी करण जोहर हा काय भलतचं बोलून गेला अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कंगनाच्या आगामी इर्मजन्सी चित्रपटाविषयी आपल्याला उत्सुकता असून प्रत्येकानं हा चित्रपट जरुर पाहावा अशा शब्दांत करणनं तिचं कौतुक केलं आहे. करणनं एक्सप्रेस अड्डावर त्याचं परखड मत मांडलं आहे. त्यात तो म्हणतो, बॉलीवूडमधील काही स्टार्स हे त्यांच्या चित्रपटाचा सोशल मीडियावर जो रिव्ह्यू येतो त्यावरुन नाराज असतात. हे चूकीचे आहे.
याशिवाय बॉलीवूडमधील काही अभिनेते त्यांच्या चित्रपटांच्या कमाईचे आकडे हे वाढवून सांगतात. रिव्ह्यू चांगले आले नाही की ही ट्रीक हमखास वापरली जाते. असे करणनं म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. यामुळे आता बॉक्स ऑफिसचे जे आकडे समोर येतात त्यावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न नेटकरी आणि चाहत्यांना प्रश्न पडला आहे.