Kangana Ranaut Slapped:कंगना रणौतच्या कानाखाली का मारली, जाणून घ्या

शुक्रवार, 7 जून 2024 (19:50 IST)
बॉलिवूडची 'क्वीन' आणि मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतसोबत आज चंदीगड विमानतळावर एक अनपेक्षित घटना घडली, ज्यामुळे लोकांना धक्का बसला.आज चंदीगड विमानतळावर एका CISF गार्डने तिला कानाखाली मारली आणि शिवीगाळ केली, ही घटना सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंगसाठी जात असताना तिच्यासोबत घडली.एका सीआयएसएफच्या महिला जवानाने  तिच्यावर चिडून तिच्या कानशिलात लगावली आणि गैरवर्तन केले.

या घटनेनन्तर महिला जवानाला ताब्यात घेतले. कंगना सुरक्षित असल्याचे कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केले. कुलविंदर कौर असे या महिला जवानाचे नाव आहे.    

शेतकरी आंदोलनादरम्यान दिलेल्या वक्तव्यावर कुलविंदर कौर अभिनेत्रीवर नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे.
2020 मध्ये तीन कृषी कायद्यांविरोधात वर्षभर देशभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या काळात कंगना तिच्या वक्तव्यांमुळे वादात सापडली होती.
 
महिंदर कौर यांच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर त्यांची तुलना शाहीन बाग आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बिल्किस दादीशीही करण्यात आली.
 
त्यावेळी, कंगनाने बिल्किस आणि महिंदर कौर या दोघींचे फोटो एकत्र ट्विट करून म्हटलं होतं की, "हा हा. ये वही दादी हैं, जिन्हें टाइम मॅगझीन की 100 सबसे प्रभावशाली व्यक्तियों की लिस्ट में शामिल किया गया था....और ये 100 रुपये में उपलब्ध हैं."
 
कंगनाने नंतर हे ट्विट डिलीट केलं पण अभिनेता दिलजीत दोसांझसोबत तिचा यावरून वाद झाला.
या घटनेनंतर, कुलविंदर कौरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ओरडत आहे आणि म्हणते आहे की, 'तिने (कंगना) सांगितले होते की येथे धरणे बसलेल्या महिलांना प्रत्येकी 100 रुपये मिळाले आहे.माझी आईही त्या निषेधात बसली होती.या प्रकरणानंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit    
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती