जॉन दुहेरी भूमिकेत

सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:51 IST)
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता या चित्रपटाच्या सेटवरुन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, जॉन अब्राहमची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. त्याचवेळी, दुसर्याम भूमिकेत तो शत्रूंचा नायनाट करताना दिसणार आहे.
 
अशा प्रकारे जॉन सत्याग्रह आणि हिंसा या दोन्हीद्वारे भ्रष्टाचार्यां ना धडा शिकवणार आहे. जॉनने या चित्रपटासाठी त्याचे वजन 10 ते 12 किलोपर्यंत कमी केले आहे.
 
चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉनने ट्रकचा टायर फोडला होता. तर आता दुसर्या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात तो 50 गुंडांसोबत लढताना दिसेल. क्लॉयमॅक्सच्या अॅक्शन सीन्सची लांबी वाढविली गेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती