स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्युँकी सास भी कभी बहू थी आजही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. नव्या सीझनपासूनच या शो मध्ये प्रत्येक आठवड्यात काही ना काही मोठमोठे ट्विस्ट बघायला मिळाले आणि प्रेक्षकांमध्ये या बद्दल उत्सुकता निर्माण होताना दिसतेय आणि आता शोमध्ये तब्बल सहा वर्षांचा लीप घेत नवी कथा सुरू होत असून हा नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. या लिपमुळे मालिकेचं कथानक आणखी नव्या रंजक वळणावर जाणार आहे.
नव्या प्रमोमध्ये तुलसी एका साध्या चाळीत राहताना दिसते आणि ती प्रार्थना करत शांत, साधं आयुष्य जगताना दिसत असून अंगद आणि त्याची पत्नी वृंदासोबत आहेत दिसायला समाधानी असली, तरी तिच्या मनात एक दडपलेली वेदना स्पष्ट जाणवते. मिहिरचा फोटो पाहताच तिच्या मनात अतूट आठवणी जाग्या होतात. पूर्ण विश्वासाने ज्याच्यावर नातं टिकून राहील असं मानलं तोच मिहिर तिच्यापासून इतका दूर कसा गेला याचा प्रश्न तिच्या मनात उमटताना दिसतोय.