२०१८ मध्ये #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. यात गायिका सोना मोहपात्राने त्याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते.