या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. यातही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल प्रेक्षकांना कॉमेडीचा जबरदस्त डोस देताना दिसणार आहेत. त्याचवेळी आता याबाबत आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे, या चित्रपटात संजय दत्तची एन्ट्री झाली असून तो नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.
या चित्रपटात संजय दत्तची भूमिका निगेटिव्ह असणार आहे. यात संजय दत्त अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे.संजय दत्तच्या एंट्रीमुळे हा चित्रपट अधिक रंजक होणार आहे. श्याम, राजू आणि बाबूराव यांच्यासोबत संजय दत्त कोणत्या युक्त्या खेळतो हे पाहावे लागेल!
रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या चित्रपटातही त्याने कमाल केली होती. 'शमशेरा'ची जादू चालु शकली नसली तरी सर्वांनी संजय दत्तचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा तो नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. संजय दत्तशिवाय अर्शद वारसीही 'हेरा फेरी 4'मध्ये दिसणार आहे.या चित्रपटाचे शूटिंग येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. मुंबईशिवाय परदेशातही चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.