बॉलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री हेलनला कोण ओळखत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आयटम डान्स गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेलनचा आज वाढदिवस आहे. 21 नोव्हेंबर 1939 रोजी बर्मामध्ये जन्मलेल्या हेलनचे पूर्ण नाव हेलन रिचर्डसन खान आहे. हेलनचे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी होती. दुस-या महायुद्धात त्यांचे वडिल निधन पावले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब 1943 मध्ये भारतात स्थायिक झाले.
हेलनची ओळख 1951 साली 'शबिस्तान'मध्ये कोरस डान्सर म्हणून झाली होती.
अनेक चित्रपटांमध्ये कोरस गर्ल झाल्यानंतर, हेलनला 'अली लैला' (1953) आणि 'हुर-ए-अरब' (1955) चित्रपटांमध्ये एकल नृत्यांगना म्हणून काम करण्याची संधी मिळाली .
हेलन यांनी दोन लग्न केले. हेलनचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी झाले होते, त्यांचे लग्न सोळा वर्षे टिकले, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान आणि अलविरा खान अग्निहोत्री ही त्यांची सावत्र मुले आहेत.
1960 ते 1970 च्या दशकात त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्य केले.
हेलनने अधिकृतपणे 1983 मध्ये चित्रपटांमधून निवृत्ती घेतली, परंतु 'खामोशी' (1996) आणि 'मोहब्बतें' (2000) सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्यां कलाकाराची भूमिका केली. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.