महाभारतातील ‘शकुनी मामा’ गुफी पेंटल यांनी वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोमवार, 5 जून 2023 (11:30 IST)
महाभारत मालिकेत शकुनी मामाची भूमिका करणारे अभिनेता गुफी पेंटलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गूफी पेंटल यांचे निधन झाले असून त्यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
महाभारत शोमधील शकुनी मामाच्या व्यक्तिरेखेने घराघरात चर्चेत आलेले गुफी पेंटल यांना 31 मे रोजी मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते. 78 वर्षांच्या गूफी यांना किडनीची समस्या होती. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.
 
रिपोर्ट्सनुसार गुफी यांची फरीदाबादमध्ये तब्येत अचानक बिघडली. प्रथम त्यांना फरिदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर मुंबईला हलवण्यात आले होते.
 
गुफी पेंटलने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. असं म्हटलं जातं की त्यांना आधी इंजिनिअर व्हायचं होतं, पण मुंबईत आल्यानंतर ते फिल्मी दुनियेकडे वळले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि त्यानंतर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला.
 
गुफींनी 1975 मध्ये 'रफू चक्कर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते 'देसी परदेस', 'सुहाग' सारख्या चित्रपटात दिसले, पण त्याला खरी ओळख मिळाली ती महाभारतातील 'शकुनी मामा' या व्यक्तिरेखेने. बीआर चोप्रा दिग्दर्शित महाभारत शो 1988 मध्ये प्रसारित झाला. आजही गूफी त्याच्या चाहत्यांमध्ये मामा शकुनीच्या नावाने लोकप्रिय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती