देव पावला, लतादीदींची प्रकृती सुधारत आहे, डॉक्टरांची माहिती

मंगळवार, 25 जानेवारी 2022 (21:06 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अकाऊंटवरून लतादीदींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.सध्या लतादीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ICU मध्ये त्यांना ठेवण्यात आलं असून डॉक्टरांची टीम अगदी बारकाईनं त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. लतादीदींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीबाबत रोज अपडेट्स देणं शक्य नाही. काही गोष्टी या खासगी असू शकतात त्यामुळे प्रत्येकवेळी अपडेट देणं शक्य होईलच असं नाही. मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे लतादीदींची प्रकृती सुधारत आहे.
 
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. कोणतीही अधिकृत माहिती आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन यावेळी डॉक्टरांनी केलं आहे. लतादीदींच्या प्रकृतीबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं सहकार्य लाखमोलाचं आहे असंही  यावेळी सांगण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती