प्रियंकाने समारंभात संयुक्त राष्ट्राचे शीर्ष राजनायिक, युनिसेफचे सद्भावना दूत आणि मुलांना संबोधित करत म्हटले आहे की माझी इच्छा आहे की मुलं स्वत्रंत राहावे. त्यांना विचार करण्याची, जीवन जगण्याची स्वतंत्रता असावी.
तिने म्हटले की मनुष्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून अद्यापही जगात मुलं हिंसा, र्दुव्यवहार आणि शोषणामुळे असुरक्षित आहे. तिने म्हटले की आम्ही जगातील उत्पीड़ित मुलांची सामूहिक आवाज बनण्यासाठी आम्ही आपणास आज आमच्याशी जुळण्याचा आग्रह करत आहोत.