'ABCD' फेम नृत्य दिग्दर्शक किशोर शेट्टीवर ड्रग्स पुरवल्याचा आरोप, अटक

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (13:59 IST)
Photo : Instagram
सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील ड्रग एंगलनंतर एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) तपास सुरू आहे. मंगळुरू गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (CCB) शनिवारी नृत्यदिग्दर्शक किशोर शेट्टी याला ड्रग प्रकरणात अटक केली. त्याच्यावर ड्रग्स असल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. किशोर शेट्टी याने प्रख्यात कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या ABCD चित्रपटात काम केले आहे. त्याने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता, ज्यामुळे तो चर्चेत आला होता. 
 
मंगळुरू पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले की, तो मुंबईहून मंगळुरूला ड्रग्ज पुरवत होता. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोरियोग्राफर किशोर शेट्टी याच्याविरुद्ध एफआयआर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट अंतर्गत करण्यात आला आहे.
 
या प्रकरणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मंगळुरू शहर पोलिस आयुक्त विकास लवकरच पत्रकार परिषद घेऊन प्रकरण उघडकीस आणतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती