बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या सेटवर भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (15:39 IST)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस'ला आग लागल्याचे वृत्त आहे. 'बिग बॉस'च्या सेटवर आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या सेटमध्ये आग कुठून लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
 
सलमान खानच्या 'बिग बॉस' शोच्या 15व्या सीझनचा फिनाले नुकताच पार पडला. या फिनालेचा भव्य प्रीमियर झाला, ज्यामध्ये बिग बॉस 15 चे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या सेटवर आग लागल्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.
 
'बिग बॉस 15' बद्दल बोलायचे तर करण कुंद्रा, सिंबा नागपाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शोमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर, तेजस्वी प्रकाशने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तसेच, त्याला एकता कपूरच्या लोकप्रिय 'नागिन 6' च्या नवीन सीझनमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती