एकता कपूरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “सर्व खबरदारी घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. मी ठीक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आवाहन करते, कृपया स्वतःची चाचणी करून घ्या. एकताच्या या पोस्टवर कमेंट करत इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी त्यांना मजबूत राहण्यासाठी कमेंट केली आहे. यामध्ये दिग्दर्शक हंसल मेहता, विक्रांत मॅसी, अर्सलान गोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.