'स्त्री' सिनेमाची सुमारे 100 करोड रुपयांची कमाई

शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (10:07 IST)
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' सिनेमाने रिलीजच्या अगदी दुसऱ्या आठवड्यात स्त्री सिनेमाला हॉलिवूड सिनेमा "द नन' या सिनेमाने मोठी टक्कर दिली. आता पुन्हा एकदा स्त्री हा सिनेमा आपला जोर कायम ठेवत आहे. कारण 13 दिवसांची कमाई समोर आली आहे. आतापर्यंत 91.77 करोड रुपयांची कमाई केली आहे. स्त्री या सिनेमाने वर्ल्डवाइड जवळपास 100 करोड रुपयांची कमाई केली आहे. 
 
राजकुमार रावच्या या हॉरर कॉमेडि सिनेमाने आपल्या ओपनिंग डेच्या दिवशी शुक्रवारी 6.83 करोड रुपये कलेक्शव केलं आहे तर पहिल्या आठवड्यात 60.39 करोड रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात स्त्री या सिनेमाने शुक्रवारी 4.39 करोड रुपयांची कमाई केली तर शनिवारी तो आकडा 7.63 रुपये होता. रविवारी 9.88 करोड रुपये कमाई झाली तर सोमवारी 3.31 करोड रुपयांची कमाई असून मंगळवारी 3.22 करोड रुपये आणि बुधवारी 2.95 करोड रुपये कमाई केली आहे. 13 दिवसांत एकूण 91.77 करोड रुपयांची कमाई केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती