आमीर खानच्या दंगलची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरु

सोमवार, 26 डिसेंबर 2016 (16:06 IST)
आमिर खानच्या दंगल सिनेमाने कमाईमध्ये नवे विक्रम करायला सुरुवात केली  आहे. पहिल्या तीन दिवसातच दंगलने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी दंगलने 29.78 कोटी, शनिवारी 34.82 कोटी आणि रविवारी 42.35 कोटी एकूण मिळून तीन दिवसात दंगलने 106.95 कोटींची कमाई केली. याशिवाय दंगलने तामिळ आणि तेलगू भाषेतही चांगली कमाई केली  आहे. दुसरीकडे आमीरच्या दंगलने सलमान खानच्या सुल्तानचा वीकेंडचा कमाईचा विक्रम मोडीत काढला. सुल्तानने पहिल्या दिवशी 36 कोटी, दुस-या दिवशी 37 कोटी आणि तिस-या दिवशी 31 कोटी मिळून एकूण 105 कोटींची कमाई केली होती. आमीरच्या दंगलने हा विक्रम मोडीत काढला. 

वेबदुनिया वर वाचा