नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीच्या टीमने काल रात्री मुंबईत एका क्रूझवर छापा टाकला. एकाअहवालात म्हटले आहे की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची या प्रकरणी एनसीबीकडून चौकशी केली जात आहे.
एनसीबीने काल रात्री कारवाई केली
शनिवारी मुंबईच्या मरीनमध्ये क्रूझवर जाणाऱ्या ड्रग्स पार्टीमध्ये झालेल्या मोठ्या कारवाईमध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आणि 10 लोकांना ताब्यात घेतले. वृत्तानुसार, हे जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.
एनसीबीचा छापा सात तास चालला
ठोस सूचना मिळाल्यानंतर, मुंबई झोनल डायरेक्टरआणि इतर NCB अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि छापे सात तास सुरू राहिले. असे मानले जाते की दिल्लीतील काही कंपनी या रेव्ह पार्टीच्या मागे होती.