अभिषेक बच्चनने 'ब्रीद: इन टू द शैडोज'च्या तिसऱ्या सीजनचे दिले संकेत?

गुरूवार, 30 जुलै 2020 (16:00 IST)
अमेझॉन प्राईम व्हिडीओचा 'ब्रीद: इन टू द शैडोज़' 10 जुलैला प्रदर्शित झाला असून 12 भागांच्या या क्राइम थ्रिलर ड्रामाने प्रेक्षक आणि समीक्षकांचे प्रचंड कौतुक मिळवले आहे. या रोमांचक मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलर सोबत बॉलीवुडचा सुपरस्टार अभिषेक बच्चनने आपला डिजिटल डेब्यू केला आहे.
 
या मालिकेचा शेवटचा भाग ज्याचे शीर्षक सी-16 आहे, त्याने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण केला आहे की हे 'C-16' आहे काय? नुकतेच अभिषेक बच्चनने आपल्या सोशल मीडियावर एक ट्वीट केले त्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे कि ब्रीद चा शेवटचा भाग 'सी-16' नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. अभिनेत्याने एक साधारण पोस्ट करताना लिहिले:
 
दुसऱ्या सीजनच्या शेवटच्या भागात अविनाश शर्लीला एक चिट्ठी देतो ज्यामध्ये 'C-16' असे लिहिलेले आहे. काय अभिषेक तिसऱ्या सीजनकडे इशारा करत आहे? असे वाटतेय की प्रेक्षकांना हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.
 
ही सीरीजची निर्मिती अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे करण्यात आली असून मयंक शर्मा द्वारे रचित आणि दिग्दर्शित आहे आणि याचे लेखन भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी केले आहे. या मालिकेसोबत अभिनेता अमित साध पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक कबीर सावंत या आपल्या पुरस्कार प्राप्त भूमिकेत दिसणार असून सोबतच निथ्या मेनन आणि सैयामी खेर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका अमेझॉन प्राईमवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती