'बधाई दो'ची रिलीज डेट आली, पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी

शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:46 IST)
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या बहुप्रतिक्षित 'बधाई दो' या चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'बधाई दो' पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला रिलीज होणार आहे. जंगली पिक्चर्सच्या या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर भूमी आणि राजकुमार ही जोडी धमाल करेल, असे मानले जात आहे.
 
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांची जोडी 'बधाई दो' या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये काम करून या दोन्ही कलाकारांनी फार कमी वेळात आपले खास स्थान निर्माण केले आहे. दोघेही अनुभवी कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रजासत्ताक दिनानिमित्त 'बधाई दो' चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हा एक विनोदी चित्रपट आहे, ज्याचा आनंद संपूर्ण कुटुंबासह घेता येईल. आम्हाला काम करताना जितका आनंद मिळाला तितकाच प्रेक्षकही ते पाहण्याचा आनंद घेतील अशी मला मनापासून आशा आहे.
 
'बधाई दो' चित्रपटात राजकुमार राव महिला पोलिस स्टेशनच्या पोलिसाच्या भूमिकेत आणि भूमी पेडणेकर पीटी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भूमी आणि राजकुमार व्यतिरिक्त शीबा चड्ढा, शशी भूषण, सीमा पाहवा, नितीश पांडे, लवलीन मिश्रा हे कलाकार दिसणार आहेत.
 
या चित्रपटाशिवाय राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर ही दमदार जोडी अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भिड’ या चित्रपटातही काम करत आहे. अलीकडेच राजकुमार आणि भूमी या दोघांनी सोशल मीडियावर या चित्रपटाची माहिती दिली होती. अनुभव सिन्हा हे स्त्रीप्रधान आणि समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे ‘भीड़’ देखील काही खास असेल असे मानले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती