नागराज मंजुळेच्या सिनेमात अमिताभ बच्चन परतले

शुक्रवार, 8 जून 2018 (09:13 IST)
निर्मात्यांनी मनधरणी केल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात काम करण्यास होकार दिला आहे. नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी माघार घेतली होती. सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले होते.
 
मात्र नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अमिताभ बच्चन असावेत, यासाठी निर्मात्यांचा प्रयत्न होते. त्यांनी केलेली मनधरणी अखेर यशस्वी ठरली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला.‘सैराट’या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजी केलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती