Bell Bottom : अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ड्रामा आणि अॅक्शनने परिपूर्ण, चित्रपटाची कथा
Bell Bottom : अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित बेल बॉटम चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना केव्हापासून प्रतीक्षा होती आणि आता अखेर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात एका दृश्याने होते ज्यात विमान उतरते आणि काही लोक ते हायजॅक करण्यासाठी तयार असतात. मागे आवाज जातो की भारत हा एक देश नसून एक विचार आहे आणि शत्रूला या विचारसरणीला हरवण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरायची आहे.
यानंतर, लारा दत्ता इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसते आणि या समस्येची स्थिती विचारतात, त्यानंतर काही अधिकारी म्हणतात की या संकटात फक्त एकच व्यक्ती आम्हाला मदत करू शकते आणि त्याचे कोड नाव बेल बॉटम आहे. त्यानंतर अक्षय कुमारची एन्ट्री आहे. अक्षयच्या पात्राचे वर्णन करताना तो म्हणतो, त्याच्याकडे तीक्ष्ण स्मरणशक्ती आहे, राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहे, गाणी शिकवतो, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन बोलतो. आता अक्षय या अपहरणात अडकलेल्या लोकांना कसे वाचवतो, ही या चित्रपटाची कथा आहे.
चित्रपट कधी रिलीज होतोय
हा चित्रपट 19 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.