एअरपोर्ट-मेट्रो वर ड्युटी करणाऱ्या CISF च्या जवानांना ‘खिलाडी’अक्षयनं केला खास सलाम !

गुरूवार, 25 जून 2020 (08:44 IST)
कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूड स्टार अक्षय कुमार यानं कायमच डॉक्टर, मेडिकल स्टाफ, कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरियर्स यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. आता त्यानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)च्या जवानांना कोरोनाच्या काळात ड्युटीवरील त्यांचं समर्पण पाहून त्यांना सलाम केला आहे आणि त्यांना धन्यवाद दिले आहेत. खास बात अशी की, CISFनं देखील अक्षयचे आभार मानले आहेत.
 
अक्षयनं सोशलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षय म्हणतो, “CISFचे जवान प्रशासनाची मदत करण्यात फ्रंट लाईनवर आहेत. ते एअरपोर्ट आणि मेट्रोची सिक्योरिटी करतात. या कोरोनाच्या काळात देव करो त्यांना काही इंफेक्शन न होवो. दिवस रात्र ही लोकं काम करत आहेत. त्यांना काही झालं तर त्यांच कुटुंबही धोक्यात येऊ शकतं. तरीही ते निस्वार्थपणे ड्युटी करत आहेत. मला त्यांना आज सांगायचं आहे की, आम्हाला त्यांच्यावर किती गर्व आहे. या सगळ्यासाठी मी त्यांना सेल्युट करतो. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आहात तर आम्ही घरात सुरक्षित आहोत. पुन्हा एकदा हात जोडून सर्वांचे आभार.”
 
अक्षयचा हा व्हिडीओ शेअर करत CISFनं ट्विट केलं आहे की, या प्रोत्साहनासाठी आम्ही प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांचे आभार मानतो. हा व्हिडीओ निश्चितच CISF च्या कोरोना वॉरियर्सला पूर्ण समर्पणासह सेवा देण्यासाठी प्रेरीत करेन.
 
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती