अक्षय कुमारचा बच्चन पांडे ट्रेलर रिलीझ

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (11:54 IST)
अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'बच्चन पांडे' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार अनेक रूपात  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमारने गँगस्टरची भूमिका साकारली आहे. बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलीन फर्नांडिस असून क्रिती सेननने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, ट्रेलरवरून हे स्पष्ट होते की अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाल करणार आहे.
 
बच्चन पांडेच्या ट्रेलरची सुरुवात अक्षय कुमारच्या भयानक स्टाईलने होते. या चित्रपटात त्याने लोकांमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे क्रिती सेननने मायराची भूमिका साकारली आहे जी व्यवसायाने दिग्दर्शक आहे. मायराला बच्चन पांडेवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने चित्रपट बनवायचा आहे. बच्चन पांडेवर चित्रपट बनवण्यासाठी ती विशूची (अर्शद वारसी) मदत घेते आणि या प्रवासात तिला बच्चन पांडेच्या अनेक छटा पाहायला मिळतात. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस बच्चन पांडेची मैत्रीण सोफीची भूमिका साकारत आहे.
 
बच्चन पांडेमध्ये अक्षय, कृती सेननं आणि जॅकलिन व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अर्शद वारसी आणि प्रतीक बब्बर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार असल्याचे मानले जात आहे. बच्चन पांडे हा तामिळमध्ये बनलेल्या जिगरथंडाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात बॉबी सिम्हा, सिद्धार्थ आणि लक्ष्मी मेनन हे त्रिकूट दिसले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती