ऐश्वर्या राय आराध्यासह नानावटीत दाखल

शनिवार, 18 जुलै 2020 (10:00 IST)
अमिताभ – अभिषेक बच्चन नंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यासह तिच्या मुलीला आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 
 
दरम्यान, ११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांनी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची त्यांनी माहिती दिली होती. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना १२ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अभिषेकनेही त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती