आदिपुरुषचित्रपटाची कथा रामायणापासून प्रेरित आहे. टीझरची सुरुवात प्रभासच्या आवाजाने होते. तो म्हणतो, 'ही पृथ्वी कोसळली किंवा हे आकाश तुटले तर न्यायाच्या हातून अन्यायाचा नायनाट होईल. मी येतोय, मी येतोय, अन्यायाची दहा डोकी दोन पायांनी चिरडून टाकायला. मी अधर्माचा नाश करायला येत आहे.'
टीझरमध्ये लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान खूपच दमदार दिसत आहे. टीझरमध्ये हनुमान, सुग्रीव, बली आणि जटायू देखील दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
आदिपुरुष या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.