अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार ,बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले

सोमवार, 21 मार्च 2022 (12:53 IST)
सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोनमने तिच्या पती आनंद आहुजा सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनमने प्रेग्नेंसीची घोषणाही आहे. हाहे फोटो शेअर करत सोनमने लिहिले - 'चार हात, जे तुझी जमेल तितकी चांगली  काळजी घेतील. दोन ह्रदये जी तुझ्या पावलाशी एकरूप होण्यासाठी आतुर आहेत. एक कुटुंब जे तुला  प्रेम आणि पाठींबा देण्यासाठी तुझी आतुरतेने वाट बघत आहे . आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहत आहोत.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

बेबीबंपसोबत अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती आनंदच्या मांडीवर निजली आहे. फोटोंमध्ये सोनमने काळ्या रंगाचा आउटफिट घातला असून बेबी बंपवर तिचा हात ठेवला आहे. याआधीही सोनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा असल्याचे म्हटले होते.
 
सोनमच्या या फोटोंवर बॉलिवूड स्टार्सच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. भूमी पेडणेकरने या जोडप्याला हार्ट इमोजी देऊन शुभेच्छा दिल्या. एकता कपूर, जान्हवी कपूर, करीना कपूर, रवीना टंडन, करिश्मा कपूर यांनी सोनमच्या फोटोवर कमेंट करून आपल्या शुभेच्छा दिल्या आहे.
 
सोनम तिच्या वैवाहिक जीवनातही खूप आनंदी आहे आणि अनेकदा पती आनंद आहुजासोबत तिचे फोटो शेअर करत असते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्न केले. तिच्या कारकिर्दी बद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरने 'सावरिया' या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती