मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. नाट्य कलाकार आणि अभिनेत्री अदिती मुखर्जी यांचे एका दुःखद रस्ते अपघातात निधन झाले. वृत्तानुसार, नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात नाट्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अदिती घराबाहेर पडली होती.
वृत्तानुसार, आदितीच्या मृत्यूची बातमी कळताच तिचे पालक ओडिशाहून दिल्लीला आले. अदिती तिच्या भावासोबत दिल्लीतील महिपालपूर येथे राहत होती. ती नाट्य विश्वात एक प्रसिद्ध नाव होती. अदिती सध्या आशुतोष राणा आणि राहुल भुचर यांच्या "हमारे राम" या नाटकात काम करत होती.